सावरकरनिष्ठांनी काय करणें उचित


 यत्तदग्रे विषमिव परिणामेऽमृतोपमम्। {भगवद्गीता}

आजच नव्हें तर सावरकर हयात असतानाही त्यांच्या लिखाणाचा, भाषणांचा, वक्तव्यांचा, तर्कांचा पदोपदी विपर्यास केला गेला.तिच विकृत परंपरा आजही सुरु आहे.आतातर विरोध करणाऱ्यांची पातळी इतकी घसरली आहे की काडीमात्र तथ्य नसलेल्या वैयक्तिक आयुष्यातल्या आणि न घडलेल्या निव्वळ खोट्या कल्पना रचून बदनाम करण्याचे सत्र आरंभिले आहे. वैचारिक मतभेद असायला कुणाची ना नाहीं. पण जर आपण स्वतःला सुशिक्षित नि शहरी म्हणवितो तेव्हा आपल्या भाषेकडे, कुणाविषयीं बोलतो याकडे लक्ष देणे क्रम प्राप्त होते. हा साधा अलिखित नियम आहे.अहो असं आहे, जिथे राम-कृष्णा सारख्या युगपुरुषांवर असत्य गोष्टी रचून वाटेल तेसे बोलतात, लिहिण्यात तिथे हल्लीच्या व्यक्तींची काय कथा! आणि हे न संपणारे चक्र आहे हे पक्के ध्यानात घ्यावे.

तथापि, आपण ज्या व्यक्तीविषयी टिप्पणी करतो,त्याचा अभ्यास केलाय कां? अभ्यास करुन तेव्हाच्या कालमान परिस्थितीचे अवलोकन केले आहे कां? नकोत्या गोष्टी उकरुन अशांतता पसरवून देशाच्या उन्नतीसाठी जे अवश्यक त्याच्याकडे पाठ करावी, हे शोभण्यासारखे आहे कां? याची उत्तरे ज्याला खरंच काही विधायक कार्य करायचे आहे त्याने नक्कीच शोधावी.ही गोष्ट सावरकरप्रेमींनाही लागु होते.

आपल्याला आवडणाऱ्या महापुरुषाच्या प्रतिमेस कुणी धक्का लावला कीं अस्वस्थ होऊन तावातावाने काही कृती करणें, प्रतिउत्तरे द्यायची, उकाळ्या-पाकाळ्या काढून उद्धार करायचा, समाजाची, नवीन पिढीची मानसिकता दूषित करायची हे असं अजून किती काळ करत रहाणार? मग षंढासारखं पहात रहायचं कां? तर तसेही मुळीच नाहीं. 

सोशल मिडिया सुरु झाल्यापासून सावरकरांचा "virtually "जन्मदिवस अगदी थाटामाटात साजरा झाला.फार नाहीं,तरी ७-८ वर्षांपूर्वीपेक्षा काल त्यांच्या स्मरणार्थ फोटो, लेख, video msg ,forwarded msg, गाणी इत्यादी साधनाद्वारे लोकांनी सावरकरांना भावांजली अधिक प्रमाणात समर्पण केल्याचे दिसून आले. कुणी त्यांच्या विषयी अधिक माहिती कुठे मिळेल अशी विचारणा करणारे पोस्टिंग केले. परिवर्तन घडत असतं पण चांगल्या गोष्टींना वेळ जास्त लागतो. आणि सावरकरांच्याबाबत हा नित्याचा अनुभव आहे! पण त्यातही समाधानकारक स्थिती खचित आहे.

ही पोस्ट खास "सावरकरनिष्ठ/भक्त/प्रेमी" यांच्यासाठी आहे की जे या विषयात काहीतरी करु पाहत आहेत.

तात्यारावांचे आपल्या हृदयांत अढळ स्थान करुन विराजमान आहेत यात दुमत नाहीं. पण सावरकरांचे विचारांचा आपल्याला प्रसार करायचा असेल तर आजच्या काळाला अनुसरून नव्या मार्गाने जावे लागले.

बादलीभर पाणी धासकन् एकदम फरशीवर ओतले तर त्याचा काही परिणाम होत नाहीं.मात्र पाण्याची संततधार त्या फरशीला खड्डा करुन त्याचं अस्तित्व दाखवते.हाच नियम आपण वापरायला काय हरकत! प्रचाराचे हे तंत्र अवलंबायचे.कुणी सावरकरांची नाहक बदनामी केली तर ऐकून घ्यायची कां? तर अजिबात नाहीं. पण त्या ढोंग्यांसाठी केवळ १% शक्ती वापरा, उरलेली ९९% शक्ती आपल्या कार्यात लावायला हवी. कारण त्या उपटसुंब्यांना अपल्या कामात अडथळा आणण्यासाठीच भाड्याने ठेवले आहेत.आणि "अति शहाणपणाचे पीक" आपल्याकडे मुबलक प्रमाणात आहेच!

आपल्या हातात social media आहे.कुणाची मत्तेदारी नाहीं.आधी प्रसार माध्यमांची अरेरावी असल्याने खरी बाजू लोकांसमोर ज्या प्रकर्षाने जायला हवी होती तशी गेली नाहीं. आता परिस्थिती उलट आहे. तुमचे product शंभर नंबरी असेल तर त्याला गिऱ्हाईक असतोच.हे व्यापारी धोरण नेमके ध्यानांत घेतले पाहिजे.आणि आपलं 'सोनं' चोवीस कॅरेट आहेच! प्रश्न आहे packaging आणि presentation चा.{आज मुद्दाम इंग्लिश शब्द वापरले} कुणाकडे चित्रकला आहे, संगीत आहे, वक्तृत्व आहे त्याचा वापर करुन शकतो.आणि आनंदाची गोष्ट लोकं ते करतही आहेत."चांगल्य गोष्टी forward करणें" हेही कमी नाहीं. फक्त आधी ते काय आहे ह्याची पुढे सरकवणाऱ्याने वाचणे, खात्री करणे आवश्यक होय.

विचार समजून घेण्यास लेखन किंवा audio/ video हे मुख्य मार्ग आहेत.आपल्याकडील माहिती इतर भाषिकांपर्यंत पोहोचली पाहिजे ह्यासाठीही प्रयत्न केला पाहिजे.

एक महत्त्वाची बाब सांगावीशी वाटते, एका व्यक्तीची महती सांगताना दुसऱ्याला खाली खेचावेच लागते कां याचा विचार करुन विरोधकांचा अनुल्लेखाद्वारे समाचार घ्यावा.आणि आपल्याला ते फार कठीण नाहीं! विरोधकांची तोंड सप्रमाण बंद (ती कधीही होत नाही, कारण त्याचा तो धंदाच आहे) करायला आपला अभ्यासही अवश्यक आहे. मराठी भाषिकांव्यतिरीक्त सावरकरांची माहिती कितीजणांना आहे? तो महाराष्ट्राबाहेरही गेला पाहिजे.सावरकरांच्या साहित्याचा हिंदी, इंग्रजी अनुवाद झाला आहे, गेल्या वर्षी विक्रम सम्पत आणि वैभव पुरंदरे या तरुण लेखकांनी इंग्रजीत उत्तम चरित्र लिहिले.मित्र अक्षय जोग यांनी सावरकरांवर वारंवार होणाऱ्या आक्षेपांचं खंडन करणारे मुद्देसुद पुस्तक लिहिलं.आपण याचा प्रसार करायचा नाही तर कुणी!

Social network मुळे बदल होत असल्याचं पाहतो, तो अधिक जोमात आणि sophisticated पद्धतीने करावयास हवा. बुद्धीवादी म्हणून घेणाऱ्या अति शहाण्या लोकांना उगाच reply देत वेळ वाया न घालवता आवश्यकता असेल तरच उत्तरे द्यावीत. देऊन उज्जत न घालता मुद्दा मांडायचा आणि निघून जायचं. झोपेचं सोंग घेतलेल्यांना... समजलंना! नाहीतरी, गल्लीत कुत्री ही भूंकायचीच,त्याकडे लक्ष देऊन आपला मौल्यवान वेळ खर्ची करुन नयें.कारण वाघाची एकच डरकाळी त्या कुत्र्यांची शेपुट मागे घालण्यास समर्थ असते.

सावरकर स्वयमेव इतक्या उच्च पातळीवर आहेत की तिथपर्यंत पोहचणे सोडा, तो मार्गही खडतर आहे.आपण आपला खारीचा वाटा उचलावा हीच त्या महान् विभूतीस आदरांजली ठरेल.

✍ अनिकेत घिवलीकर. 

{सदर पोस्ट मे २०२०ला लिहिलेली, blogवर पुनर्प्रकाशित करीत आहे}

Comments

Popular posts from this blog

श्रीएकनाथ महाराजांचे विष्णुसहस्रनाम चिंतन, भाग :१

श्रीविष्णुसहस्रनामांतर्गत नवविधाभक्ती, भाग १

श्रीनामदेवरायांचे विष्णुसहस्रनाम चिंतन, भाग: १