Posts

Showing posts from September, 2021

आचार्य विनोबा भावे यांचे विष्णुसहस्रनाम

Image
  देवादि तूं तूं चि पुराण आत्मा,  जगास ह्या अंतिम आसरा तूं। तूं जाणतोसी तुज मोक्ष धामा,  विस्तारिसी विश्व अनंत-रुपा॥ {गीताई} महाराष्ट्रातील प्रज्ञावंत व्यक्तिमत्व आचार्य विनोबा भावे यांचे श्रीभगवद्गीतेचे रसाळ पद्यात्मक मराठीत रुपांतर "गीताई" आपल्याला परिचयाचे आहे.अनेकांना ते शाळेत शिकल्याचे स्मरण होईल.लहान मुलांकरीता त्यांनी लिहिलेल्या बोधप्रद कथा आजही मार्गदर्शक आहेत. त्याच प्रकारे सर्वसामान्यांना दुर्बोध वाटणार्‍या विष्णुसहस्रनामाचा भावार्थ अत्यंत सोप्या आणि प्रत्यक्ष व्यवहारातली उदाहरणं देऊन विनोबांनी त्याचे विवरण केले. म.गांधींच्या आज्ञेने वर्धा येथील परंधाम आश्रमातील कार्य ,भूदान यात्रा हे सामाजिक सेवाकार्य त्यांनी केलेच. तथापि बालपणापासून धर्म नि अध्यात्माविषयीं पराकोटीची श्रद्धा व निष्ठा विनोबांच्या जीवनाचा मूळ गाभा होय. कुमारवयांत सुरु झालेल्या त्यांच्या या वाटचालीमुळे त्यांच्यात वैराग्य बाणले होते नि तसेच पोषक वातावरणही लाभले. विनोबा त्यांच्या अध्यात्मिक जीवनाचे तीन टप्पे मानीत. ते म्हणतात, "माझ्या जीवनातील पहिल्या अवस्थेत पांच संतांचा (ज्ञानेश्वर,नामदेव,एकना...