सोपान आनंदें समाधि बैसला
श्रीसोपानदेव महाराज सप्तशतकोत्तर रोप्य समाधी उत्सव महाराष्ट्रामध्यें भागवतधर्माचे पिक जर कुणी रुजविले असेल तर ते निःसंशय एकाच घराण्यात जन्माला आलेल्या चार दिव्य विभूतींनी होय.त्यांची नांवे निदान मराठी जनांना माहित नसेल असें होणे शक्य नाहीं. श्रीनिवृत्तीनाथ, श्रीज्ञानदेव, श्रीसोपानदेव आणि श्रीमुक्ताई.एक सुभाषित आहे की दुर्लभं भारते जन्म मानुष्यं तत्र दुर्लभम्। म्हणजे, भारतात जन्माला येणे हे दुर्लभ आहे, परंतु त्याहून दुस्तर तेथे माणूस म्हणून जन्मणे. त्याच चालीवर मला म्हणावेसे वाटते, दुर्लभं भारते जन्म महाराष्ट्रेऽतिदुर्लभम्। . की, महाराष्ट्रात जन्माला येणे त्याहून दुस्तर होय.यामध्यें रव्याच्या कणाएवढाही प्रांतवाद नसून नितांत अभिमानची आणि माझ्या पूर्वसुकृताची जोड आहे. आपण कुठे, कुणाच्या पोटी, कसल्या परिस्थितीत जन्माला यावे हे काहीं आपल्या हाती नाहीं.पण जिथे आलो त्या समाजाचे ऋण आपल्या शिरावर आहे नि अंशतः ते फेडायचेही आहे याची जाणीव महत्त्वाची.अशा या संतांनी, सत्पुरुषांनी पावन केलेल्या महाराष्ट्रात आपण जन्माला यावे हा बहुमान मिळण्यासारखे होय! असो. किती अपूर्व गोष्ट आहे आ...