श्रीविष्णुसहस्रनाम आणि श्रीमारुतीराय
काय भक्तीच्या त्या वाटा । मज दावाव्या सुभटा।। श्रीतुकाराम महाराज श्रीविष्णूसहस्रनामस्तोत्र स्वयमेव भगवंताचे अवतार लीलाचरित्र आहे, अशी अभ्यासांती जाणीव होते. म्हणूनच लोकमान्य टिळकांनी त्यास भक्तिकोश असें कौतुक केलें ते किती यथार्थ आहे याचा प्रत्यय येतो. भगवंत हा सहस्रनामातल्या (७३६)व्या नामाप्रमाणे भक्तवत्सल आहे, तेव्हा आपल्या प्रिय भक्तांची नामेही तो आनंदाने धारण करतो हे पुराण कथेवरून आपण पाहतो.या न्यायाने हनुमान अथवा मारुती ही नामें प्रत्यक्ष जरी सहस्रनामांत आली नसली तरी त्याच्या अवतार कार्यासंबंधी किंवा व्यक्तिमत्वाचे साधर्म्य सांगणारी अनेक नामें अवश्य सापडतात. भगवंताला आपला अनन्य भक्त किती प्रिय असतो हे सांगताना श्रीनाथ महाराज भा...