तां वन्दे श्रीभारती संस्कृतिम्
या वेदोपनिषत्स्वनादिसमयाद्मूलं बिभर्ति स्वकम्। या रामायणभारतादिषुहिता प्राज्ञैः समाख्यापिता॥ या वै व्यष्टिसमष्टि मड्ग़लकरी संपूर्णता बोधिनी। तां वन्दे विनयेन तत्परतया श्रीभारती संस्कृतिम्॥ - स्वामी वरदानंद भारती. ज्या संस्कृतीची मूळे अनादीकालापासून वेद, उपनिषदादिंमध्यें रुजलेली आहेत, ज्या संस्कृतीचा हितकार विचार आणि वैशिष्ट्ये रामायण, महाभारतादी प्राचीन ग्रंथातून थोर बुद्धिमंतांनी प्रकट केला, जी संस्कृती व्यष्टि म्हणजे व्यक्ती आणि समष्टि म्हणजे सर्व समाजाचे कल्याण साधून देणारी आहे, जी सर्व दृष्टीने संपूर्णतेचा बोध करून देते, त्या ऐश्वर्ययुक्त भारतीय संस्कृतीला तत्परतेने मी विनयपूर्वक वंदन करतो. हिंदुस्थानाच्या स्वातंत्र्यदिनाचा अमृत महोत्सव संपूर्ण देशामध्यें मोठ्या दिमाख्यात साजरा होत आहे.पंचाहत्तर वर्षांपूर्वी पारतंत्र्याच्या शृंखला निखळून आनंदवनभुवन निर्माण झाले.ह्यामागे अगणित देशभक्तांनी रक्ताचे पाणी करून, घरावर...