Posts

श्रीविष्णुसहस्रनामातील गुरुतत्त्व

Image
  नमोऽस्तु ते व्यास विशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र।  येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वलितो ज्ञानमयः प्रदीप।।  सनातन वैदिक परंपरेमध्यें गुरुचे स्थान परमपूजनीय तथा अनन्यसाधारण आहे. मनुष्य माता-पितानंतर ज्या तत्त्वाच्या किंवा व्यक्तीच्या उपकारात आजन्म ऋणी असतो ते गुरूच्या. अनादीकालापासून चालत आलेल्या ज्ञानपरंपरेचा पायाच मुळी गुरू-शिष्य या पवित्र नात्यावर आधारलेला असून आजही तो अबाधित आहे किंबहुना येणाऱ्या अनेक कालखंडासाठी सुद्धा तसाच राहणार. गुरु मनुष्याच्या जीवाला आकार देणारा केवळ शिक्षक नसून त्याचे संपूर्ण आयुष्य उच्च कोटीच्या ध्येयाकडे घेऊन जाणारा पथदर्शक असतो. वेद, उपनिषद, पुराणे, रामायण, महाभारतासारख्या प्राचीन तत्त्वज्ञानामधून ते अर्वाचीन संस्कृत-प्राकृत रचनांतून ते अगदी आधुनिक काळातल्या पुस्तकांपर्यंत गुरुमहात्म्याला दुसरा पर्याय सापडत नाहीं. गुरु अज्ञानरुपी अंधकार दूर करून ज्ञानरूपी प्रकाश देणारा आहे म्हणूनच त्याला साष्टांग नमस्कार करून कृपा प्राप्त करून घ्यावी. "अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया। चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः॥" ज्ञान गुरुशिवाय प्राप्...

श्रीविष्णुसहस्रनामांतर्गत नवविधाभक्ती : अंतिम भाग.

Image
  ज्ञान, कर्म तथा भक्तिमार्ग हें काही वेगळे काढता येत नाहींत. परंतु हा विषय येथें चर्चिला जाणें प्रस्तुत नव्हे. या एका विष्णुसहस्रनामस्तोत्राद्वरें अनायसें नवविधाभक्ती घडते. 'कुणी पठण करीत असेल अथवा ध्वनिमुद्रण लावले असेल तर भाविकाची श्रवणभक्ती साधते. जो स्तोत्र म्हणतो त्याची कीर्तनभक्ती होते. असंख्यलोक नित्य सहस्रनामाची आवर्तने करणारी आहेत, त्याची नामस्मरणभक्ती अखंड सुरू असते. आपल्या सद्गुरूंच्या चरणांशी किंवा देवालयात बसून सहस्राचा पाठ त्यांना समर्पित करीत तो पादसेवनभक्ती करतो. कुणी तुळशीदल, बिल्वदल, पुष्पांनी अथवा यज्ञात आहुतीद्वारें एकेका नामोच्चाराने भगवंताची पूजा करतो त्याची अर्चनभक्ती होते. प्रत्येक नामाआधी प्रणवोच्चार करून शेवटी नमः असें सहस्रवेळा नमस्कार करणे ही वंदनभक्ती . केव्हांही स्तोत्र पठण हे नित्य सेवेचे व्रत म्हणून आचरणारे दास्यभक्तीने आणि आपल्या आराध्यापासून कधीच दूर न होणारे साधक या स्तोत्राच्या साह्याने सख्यभक्तीच आचरीत असतात. आठही भक्ती प्रकार जेथे एकवटली जाते तेव्हा विनासायास होणाऱ्या सहस्रनामाच्या आवर्तनाला आत्मनिवेदनभक्ती च म्हणावी.' १} श्रवणभक्...

श्रीविष्णुसहस्रनामांतर्गत नवविधाभक्ती, भाग १

Image
  नवधा भगति कहऊँ तोहि पाहीँ। सावधान सुनु धरु मन माहीँ॥ - श्रीतुलसीरामायण श्रीभगवंताविषयीं आत्यंतिक श्रद्धा, निष्ठा, उत्कट समर्पणभाव तथा अनन्यत्व म्हणजे भक्ती. अध्यात्मक्षेत्रांत उच्च प्रेमाच्या आविष्काराची परिणीती भक्तीमध्यें होते. प्रेम किंवा आपुलकी ही मनुष्याची स्वाभाविक वृत्ती आहे. पृथ्वीवरील सगळ्या प्राणिमात्रांमध्यें माणूस वगळता जगायचे कसें हे शिकवावे लागत नाहीं. लहान बाळापासून वृद्धावस्थेत जाईपर्यंत मनुष्याला किती नि काय शिकवावे लागते याची यादी देण्याची आवश्यकता नाहीं किंबहुना करताही येणार नाहीं. ते प्राण्यांबाबतीत नाहीं. महाभारतामध्यें शांतीपर्वात एक श्लोक आहे, "आहार निद्रा भय मैथुनं च सामान्यमेतत् पशुभिर्नराणाम् |" आहार, निद्रा, आपत्तीचे भय आणि कामवासना ह्या गोष्टी मनुष्यासारख्या प्राण्यांच्याही समान आहेत. यापलीकडे परमेश्वराने "ब्रह्माचे गुढ" उकलण्यासाठी माणसाच्या अंतरंगामध्यें बुध्दी नामक पदार्थ देऊन त्याद्वारें तो इतर प्राण्यांपासून निराळा झाला. माणूस ही परमेश्वराची परमोच्च निर्मिती आहे, याची ग्वाही स्वतः श्रीभागवतामध्यें मिळते. "सृष्ट्वा पुराणि विविध...

श्रीविष्णुसहस्रनामांतर्गत श्रीनरनारायणावतार

Image
  नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमम्। देवीं सरस्वतीं चैव तातो जयमुदीरयेत्।। श्रीभागवत महापुराणाच्या प्रथम स्कंधाच्या द्वितीय अध्यायांत हा वरील श्लोक आला आहे. त्यात समस्त पातकांचे परिमार्जन ज्यांच्या स्मरणाने होते अशा नरनारायण या ऋषिद्वयांना पहिला नमस्कार केला आहे. त्यातले नारायण म्हणजे प्रत्यक्ष भगवान महाविष्णूच आणि दुसरा तो श्रेष्ठतम पुरुष नर. दुसऱ्या पद्धतीने विचार केला तर नारायण हे विष्णू आणि नर हे शिव या तऱ्हेने जगातले द्वंद्व हे नरनारायण रूपाने प्रतीत होतात.  महाभारत तथा अन्य पुराण संहितेमध्यें हा श्लोक मंगलाचरण म्हणून उद्धृत केलेंला आढळतो. त्याचे कारण असें की देव, ऋषीच नव्हे तर मनुष्याकडून काहीं पापकर्म घडले तर त्याचे परिमार्जन, शुद्धीकरिता नरनारायण ऋषींचे दर्शन वा स्मरण आवर्जुन करण्यास सांगितले आहे. म्हणून नारायण आणि नरोत्तम नर या दोघांना वंदन करण्याची पद्धत आपल्याकडे आहे की ज्यांच्या आशीर्वादाने घेतलेले व्रत, कार्य निर्विघ्नपणे ध्येयापर्यंत जाते. किंबहुना भगवंताच्या या अवतार कार्याचा उद्देशच मुळांत दीनोद्धार व आत्मानुभूती करवून देणारा आहे. म्हणून सहस्रनामातील (१८४)...