Posts

Showing posts from January, 2026

श्रीएकनाथ महाराजांचे विष्णुसहस्रनाम चिंतन, अंतिम भाग.

Image
  -: सहस्रनाम अभंग विवरण :-  अभंग १:  नामपाठे भीष्में कामातें जिंकीलें । सार्थक पै केलें विहिताचे ।।  आदरे आवडी नामपाठ गावें । सर्वांवरी होय सत्ता त्याची ।। जनार्दनाचा एका होऊनी शरण । घाली लोटांगण संत चरणी ।। भावार्थ: पितामह भीष्मांनी भगवंताच्या नामोच्चाराद्वारें भौतिक विषयांवर विजय मिळविला आणि आपल्या जीवनाचे सार्थक केलें. जो आदराने, आवडीने नामाचे पठण करतो त्याची सर्वांवर सत्ता चालते. नाथमहाराज म्हणतात, मी स्वामी जनार्दन महाराजांचा शिष्य अशा संतांना शरण जाऊन त्यांच्या चरणावर लोटांगण घालतो. विवरण: श्रीमन्महाभारतातील दोन उत्तुंग विभूतीमत्व म्हणजे भगवान् श्रीकृष्ण आणि गंगापुत्र देवव्रत भीष्माचार्य. श्रीविष्णुसहस्रनामाचे उद्गाते हे भीष्मराज आहेत हे सर्वश्रुत आहे. त्यातही हे स्तोत्र वा नामावली प्रत्यक्ष भगवंत सम्मुख असताना राजा युधिष्ठिरास सांगितले, हेही आपल्याला ज्ञात आहे. महाभारताच्या अनुशासनपर्वामध्यें महर्षी श्रीव्यासांनी संकलित केलेलें हे नामसहस्रस्तोत्र भगवंताच्या सहस्रावधी विशेष गुणांचे नामरूपाच्या आधारे केलेली स्तुती असून, ती भीष्मांनी शरपंजरी पडले असताना केलीं...