सावरकरनिष्ठांनी काय करणें उचित
यत्तदग्रे विषमिव परिणामेऽमृतोपमम्। {भगवद्गीता} आजच नव्हें तर सावरकर हयात असतानाही त्यांच्या लिखाणाचा, भाषणांचा, वक्तव्यांचा, तर्कांचा पदोपदी विपर्यास केला गेला.तिच विकृत परंपरा आजही सुरु आहे.आतातर विरोध करणाऱ्यांची पातळी इतकी घसरली आहे की काडीमात्र तथ्य नसलेल्या वैयक्तिक आयुष्यातल्या आणि न घडलेल्या निव्वळ खोट्या कल्पना रचून बदनाम करण्याचे सत्र आरंभिले आहे. वैचारिक मतभेद असायला कुणाची ना नाहीं. पण जर आपण स्वतःला सुशिक्षित नि शहरी म्हणवितो तेव्हा आपल्या भाषेकडे, कुणाविषयीं बोलतो याकडे लक्ष देणे क्रम प्राप्त होते. हा साधा अलिखित नियम आहे.अहो असं आहे, जिथे राम-कृष्णा सारख्या युगपुरुषांवर असत्य गोष्टी रचून वाटेल तेसे बोलतात, लिहिण्यात तिथे हल्लीच्या व्यक्तींची काय कथा! आणि हे न संपणारे चक्र आहे हे पक्के ध्यानात घ्यावे. तथापि, आपण ज्या व्यक्तीविषयी टिप्पणी करतो,त्याचा अभ्यास केलाय कां? अभ्यास करुन तेव्हाच्या कालमान परिस्थितीचे अवलोकन केले आहे कां? नकोत्या गोष्टी उकरुन अशांतता पसरवून देशाच्या उन्नतीसाठी जे अवश्यक त्याच्याकडे पाठ करावी, हे शोभण्यासारखे आहे कां? याची उत्तरे ज्याला खरंच का...