Posts

Showing posts from September, 2024

श्रीविष्णुसहस्रनामांतर्गत श्रीवामनावतार

Image
  कृपा भाकितां जाहला वज्रपाणी ।   तया कारणें वामनु चक्रपाणी ।।  -  श्रीसमर्थ रामदासस्वामी भोगवादी प्रवृत्ती बळावली म्हणजे समाजातले सत्व निघून जाते. हा सिद्धांत नवा नाहीं, पुराणकाळापासून याचे दाखले आपल्याला पाहावयास मिळते. त्यातील इतिहास म्हणजे बलीराजाची कथा.  भगवतभक्त प्रल्हादाचा नातू नि विरोचनाचा पुत्र बली ब्राह्मणांच्या जोरावर आणि आपल्या बाहुबलाने स्वर्गस्थ इंद्राचा पराभव करून गुरु शुक्राचार्यांच्या आशीर्वादाने इंद्र पदावर आरुढ झाला.  देवमाता अदितीने घडलेला प्रकार पतिदेव ऋषी कशापांना कथन करून शोक व्यक्त केला. इंद्रादी पुत्रांना स्वस्थानापासून भ्रष्ट होण्याची पाळी आल्याचे सांगितले. झाल्या प्रकाराचा बिमोड करण्यास आणि देवांचे गतैश्वर्य पुन्हा कसे प्राप्त होईल याची पृच्छा तिने केली. कश्यपांनी अदितीस श्रीनारायणाची उपासना करण्याचे सांगून “पयोव्रताने” त्याची कृपा संपादित केल्यास देवांच्या कार्यास बळ मिळेल असें आश्वासन दिले तथा गेलेंले वैभव ते पुन्हा प्राप्त करू शकतील असेंही वचन दिले. त्याप्रमाणे अदितीने व्रतारंभ तथा द्वादशाक्षरी मंत्राचा जप सुरू केला. व्रता...

श्रीविष्णुसहस्रनामांतर्गत श्रीवराहावतार

Image
  ।। धरि बराह बपु एक निपाता ।।  -श्रीतुलसीरामायण {परमात्म्याने वराहाचे शरीर धारण करून हिरण्याक्षाला मारले } भगवंताच्या सगळ्या अवतारांमध्यें श्रीवराहावतार हा अत्यंत गूढ तथा गहन असा पृथ्वी स्थिरस्थावर होण्यापूर्वीचा आश्चर्यकारक रूपकात्मक अवतार आहे श्रीवराहवताराची कथा श्रीभागवतपुराणानुसार संक्षिप्तरित्या कथन करून त्या अवतार लीलेचा कथा भाग सहस्रातल्या नामांद्वारे विवरण्याचा प्रयत्न या लेखातून केला आहे. भगवंताचा हा अवतार आधी सांगितल्याप्रमाणे समजण्यास कठीण असल्याने एक एक स्वतंत्र नामांच्या आधारे "जे काहींसे आकलन" झाले त्या संबंधी आपणास विशद करून देण्याचा माझा हा प्रयत्न होय.  त्याचे कारण असें की या वराह अवताराचे सविस्तर वर्णन भागवतकारांनीही केलें नाहीं. त्यास "यज्ञस्वरूप" मानून स्तुती गायली आहे. महाभारत आणि इतर पुराणांमध्यें अल्पभेदाने भागवतातलीच कथा आली आहे. त्याचे विवरण त्या त्या नामांप्रमाणे ओघाने घेण्यात आले आहे.  श्रीभागवताच्या तिसऱ्या स्कंधात ही अवतार कथा आली असून, ती याप्रकारे;  सृष्टीच्या आरंभी ब्रम्हदेवांनी स्वयंभुव मनु आणि भार्या शतरुपा यांना उत्पन्न करून ...