श्रीशिव-विष्णुसहस्रनाम अर्थात हरिहर ऐक्य
श्रीमन्महाभारतांतर्गत " शिवसहस्रनाम आणि विष्णुसहस्रनाम" अर्थात ☆ हरि - हार ऐक्य ☆ अग्राह्यमचलं शुद्ध बुद्धिग्राह्यं मनोमयम् । {महाभारत} आपल्या हिंदुधर्म संस्कृतीमध्यें अनंत देवता आणि त्यांचा असंख्य पूजा पद्धती रूढ आहेत.पूजनासमवेत स्तोत्रांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे नि धार्मिक वाङ्मयांतला अत्यंत लोकप्रिय स्तवन प्रकार आहे.त्यामध्यें वेदसुक्तापासून ते प्राचीन-अर्वाचीन संत- महापुरुषांनी केलेंल्या रचनांचा एकत्र समावेश करायचा म्हटला तर लक्षावधी पाने खर्ची होतील. सहस्रनाम हें नामावली प्रकारचे स्तोत्र आहे.सहस्रनामाचे प्रजोजन असें कीं,त्या त्या देवतेप्रति भक्तांच्या मनांत अतीव श्रद्धा, निष्ठा , प्रेम आणि भक्ती अधिकाधिक दृढ व्हावी हे होय. खरंतर प्रत्येक अक्षर, व्यंजन, स्वर, छंद, शब्द, वाणी हें ईश्वराचेच प्रतीक आहे.त्यास अक्षरब्रह्म म्हणा वा शब्दब्रह्म किंवा नादब्रह्म.त्या भगवंताचे गुणमहात्म्य वर्णन करून ऋषी, आचार्य, संतादी थोर सत्पुरुषांनी सामान्य जनांना सदैव ऋणी केलें आहे. महाभारतकाळापासून देवाधिदेव श्रीशंकर आणि पुरुषो...