Posts

Showing posts from June, 2024

श्रीविष्णुसहस्रनाम आणि वृक्ष

Image
  वटपौर्णिमेनिमित्त विशेष लेख  श्रीविष्णुसहस्रनाम आणि वृक्ष आजीव्यः सर्वभूतांनां ब्रह्मवृक्षः सनातनाः। - महाभारत भगवंताने सृष्टी निर्मिती प्रक्रियेत रजोगुणाचा आश्रय घेऊन वृक्षादि वनस्पती उत्पन्न केल्या त्यास ' वैकृतिक सृष्टि ' असें भागवतकारांनी म्हटले आहे. आणि अव्यक्त तथा अव्यय बीजापासून जे ब्रम्हांड निर्माण झाले त्यास ' विश्ववृक्ष ' असें लाक्षणिक वर्णन सगळ्या प्राचीन तत्वज्ञानातून केलेंले आहे. प्रस्तुत विषय दोन तऱ्हेने पुढे जाणार आहे. वृक्ष या संकल्पनेला अध्यात्मात किंवा तत्त्वज्ञानाच्या परिभाषेत ' ब्रह्मवृक्ष ', ' विश्ववृक्ष ', ' सनातन वृक्ष ', ' ब्रह्मवन ' या संज्ञा वापरण्याची वहिवाट आहे. याचा अर्थ ' प्रकृतीचा पसारा ' अथवा आपल्या भोवतालची दृष्य सृष्टी असा आहे. हा पहिला भाग , आणि दुसरा भाग मूळं, खोडं, फांद्या, पाने, फुले - फळे या स्थूल अर्थाने झाड म्हणून आपण ओळखतो तो भोग्य वस्तू वृक्ष.  श्रीविष्णुसहस्रनामातल्या काहीं नामांद्वारे वृक्ष या संज्ञेचा वरील दोनही वर्गीकरणांचा विचार करून त्यातील गर्भितार्थ उलगडण्याचा प्रयत्न या लेखाम...