आठवण बाबूजींची
शिवाजी पार्कचे शंकर निवास.जात येता अनेकदा पहात नि मनांत विचार येई कधी या असामान्य व्यक्तिमत्वाची भेट होईल का! एके दिवशी ते धाडस करून जिने चढून वर गेलो.दारावरची सुधीर फडके अशी सुबक पद्धतीने रंगवलेली पाटी वाचून काहीं क्षण बेल वाजवण्याचा धीर होत नव्हता.मनाचा हिय्या करून बेल वाजवली. बाबूजींच्या पत्नी सौ.ललिताबाई फडके उर्फ माई यांनी दार उघडून विचारणा केली, कोण आपण, काय काम? माझं वय सोळा आणि थेट अहो-जाहो! मी ओशाळलोच.काम.. म्हटलं मी अनिकेत घिवलीकर,शिवाजी पार्कलाच रहतो,मला बाबूजींना भेटायचे आहे. बरं म्हणाल्या. पण बाबूजी घरी नाहींत तासा- दीड तासाने येतील तेव्हा या.मी नमस्कार करून परत घर आलो.पण आज निश्चयच केलेला बाबूजींना भेटायचे. संध्याकाळी पुन्हा गेलो.बाबूजी अजून आले नव्हते.पण माईंनी एव्हाना बाबूजी येतील म्हणत मला घरात घेतले.घरात प्रवेश करताच बाबूजींचा मोठा फोटो दिसला आणि मनोमन नमस्कार केला.पोस्टवर जो फोटो लावला आहे तोच.माईंना माझा परिचय करून देत असताना दिवाणखान्यातल्या चारही भिंतीवरचे रॅक स्मृतीचिन्हांनी गच्च भरलेले पाहून थक्क झालो. तेवढ्यात दारावरची बेल वाजली आणि माई म्हणाल्या ह...