Posts

Showing posts from June, 2021

महाभारतांतर्गत श्रीविष्णुसहस्रनाम

Image
  वैदिक सनातनधर्माचें तत्वज्ञान व नीतिमूल्यांचे सार असलेला ग्रंथ श्रीमद्भगवद्गीता   आणि भगवंताच्या असीम गुणैश्वर्याचा समुचय श्रीविष्णुसहस्रनाम  या स्तोत्रात प्रकट झालेला आहे.श्रीशंकराचार्यां पासून सगळ्यांनी या दोन्हीचे माहात्म्य शिरोधार्य मानले तथा वृद्धींगत होत गेले. आचार्यांनी गेयं गीता नामासहस्रं   अशी त्याची महती आपल्या चर्पटपञ्जरिकेत आवर्जून नमूद केलीं आहे. गेयं म्हणजे गाण्याजोग अर्थात समस्त मानवजातीला सुगमतेने पारमार्थिक उन्नती भगवद्गीता आणि सहस्रनामाच्या आश्रयाने करता येईल. महाभारताच्या अनुशासन पर्वात पितामह भीष्मांनी धर्मराज युधिष्ठिरास हे दिव्य सहस्रनाम सांगितला आणि ते सांगत असताना प्रत्यक्ष भगवान् श्रीकृष्णाचा त्यास अनुमोदन होते.हा या सहस्रनामाला एका प्रकारे आशीर्वादच म्हणावा लागेल. त्याची थोडक्यात कथा अशी आहे - भरती युद्धानंतर श्रीकृष्ण भीष्म पितामहांकडे येऊन त्यांनी पांडवांना उपदेश करण्याविषयीं सांगतो. परंतु भीष्म वासुदेवास म्हणतात की,"स्वतः भगवंत आपण असताना मी काय उपदेश द्यावा?" तथापि भगवंतांनी भीष्मांनाच उपदेश करण्याची विनंती केलीं. अष्टसात्विक तेज गं...

"BLOG-SPOT" वर आगमन

Image
  सोशल मिडियावर आल्यापासून सणांच्या निमित्ताने शुभेच्छा संदेश किंवा संतादी महापुरूषांच्या जयंत्या- पुण्यतिथी दिनी दोन चार वाक्ये लिहून एखादा फोटो अपलोड करून आपली भावना व्यक्त करावी अशी लिखाणाची  सुरुवात झाली.त्यानंतर वाक्यसंख्यांमध्ये वाढ होऊन माझ्या आवडत्या विषयांवर लिहिण्याचा छंद जडला. वाचन करता करता लिहिण्याची सवय केव्हां लागली मला फारसं आठवत नाहीं.तथापि २०१६ पासून फेसबुकवर संक्षिप्त स्वरुपांत लेखन पोस्ट करणें सुरु झालें.आणि पुढल्याच वर्षी श्रीविष्णुसहस्रनामाचा अभ्यास करीत असताना त्यावर लिहायला हवे हे ठरवून नाम निरुपण, सहस्रनाम महतीची लेखमाला हाती घेतलीं ती लोकांना आवडली. स्वातंत्र्यवीर सावरकर हे माझे श्रद्धास्थान.त्यांच्या विषयींही लहान मोठे लेखन होत गेलें. लेखक नसूनही वाचकांनी वेळोवेळी दिलेली पसंदीची पोचपावती ही माझे लेखन त्यांना आवडण्याचे लक्षण होतें आणि त्यामुळें माझा उत्साहही वाढला. एखादा लेखक किंवा कलाकार त्याच्या विषयांत मन लावून अभ्यास, संशोधन करून ते लोकांपुढे सादर करतो.त्यात त्याचे मानसिक तथा शारीरिक श्रम असतात.आणि मग त्याच्या कामावर कुणी दुसरा व्यक्ती "चौर्यकर...