Posts

Showing posts from August, 2021

वासुदेवः सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः

Image
: वाङ्मयरूपी श्रीदत्तोपासनेचे प्रवर्तक : वैदिकधर्माचे पुनरुत्थान करण्याचे महान कार्य दोन सहस्रावर्षांपूर्वी श्रीमज्जगद्गुरूशंकराचार्यांनी आपल्या अलौकिक सामर्थ्याने केले, नि चारही आश्रमांची विस्कटलेली घडी पुन्हा बसवून दिली. तत्त्वज्ञानाबरोबर सामान्यजनांना सुलभ उपासना पद्धतीचेही मार्गदर्शन केले.त्याचे प्रातिनिधिक स्वरूप पंचायतन पुजेमध्यें आजही पहायला मिळते.श्रीशंकराचार्यांच्या दिव्य चरित्र सदृश्य जीवनगंगा महाराष्ट्रदेशांत १६७ वर्षांपूर्वी    परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद्वासुदेवानंद सरस्वती (टेम्बे) स्वामी महाराज  या स्वरूपात पुनश्च अवतीर्ण झाली. सावंतवाडी संस्थानाच्या माणगांव येथे शके १७७३(इ.स १८५४) श्रावण वद्य पंचमीस थोरल्या स्वामी महाराजांचा जन्म झाला. भगवान् दत्तात्रेयांचा पंचमावतार हा स्वामी महाराजांचा मानतात,तो त्यांच्या चरित्रावरून आपल्याला प्रत्ययाला येईल.वैदिक धर्माची थोरवी वाढवण्यासाठी झालेला जन्म त्यांच्या बालवयातच सुरु झालेल्या धर्मकार्यातून दिसून आला.अतुल धारणाशक्तीची सिद्धी जन्मजातच "दत्त" म्हणून समोर उभी असत.वयाला एक वर्ष पूर्ण होताच वडील गणेशपंतांनी बाल वा...

एवं प्रवर्तितं चक्रम्

Image
  भारतीय स्वातंत्र्यदिनाचा अमृतमहोत्सव   हिंदुस्थान ब्रिटिशांच्या कचाट्यातून मुक्त होऊन आज पंचाहत्तर वर्षे झाली.हा सोहळा उत्साहात साजरा झाला असता.पण या महामारीमुळें सण,उत्सव,मोठाले समारंभ सगळ्या गोष्टी थोडक्यात नि आटोपते करण्याशिवाय अन्य पर्याय नाहीं. आज स्वातंत्र्यदिनाला पंचाहत्तर वर्षे झाली खरी,पण भारत पारतंत्र्यात किती वर्ष होता काही कल्पना?तर साधारण साडेनऊशे वर्ष !भारतावर अनेक राजवटींच्या स्वाऱ्या झाल्या.त्याचा धावता आढावा जरी घ्यायचा झाला तरी डोकं सुन्न होईल. इ.स ७११ मध्यें महंमद बिन कासीमची पहिली स्वारी सिंध प्रांतावर झाली.त्यानंतर क्रूर,लुटारू धर्मांधांची रांगच लागली.गज्नवी महंमद, घोरी,खिलजी,मोगल,तुघ्लख, तयमुर, बहामनी, बेरीशाही, इमादशाही, निजामशाही, आदिलशाही, कुत्बशाही.ह्या सगळ्या इस्लामी आक्रमकांचा काळ इ.स. १००० जरी धरला तो १७५० पर्यंत सातशे- साडेसातशे वर्ष इतका प्रदीर्घ आहे. जरी संपूर्ण हिंदुस्थान त्यांच्या ताब्यांत नव्हता तरी लहान सहान राज्ये निर्माण करून हिंदुधर्माची, संस्कृतीची, सभ्यतेची जी अतोनात पायमल्ली केली त्याला सीमा नाहीं.पायमल्ली हा शब्दही तोकडाच आहे. य...

संतशिरोमणी श्रीनामदेव महाराज

Image
भागवत धर्माची पताका महाराष्ट्रात रोवून थेट पंजाबपर्यंत फडकावणारे असें थोर भगवद्भक्त श्रीनामदेव महाराज . श्रीपांडुरंगाने नामदेवरायांचे बालपणापसून ते अगदी समाधीपर्यंतचे सगळे हट्ट आनंदाने पुरविले.विठ्ठलाच्या अनन्य आणि निस्सीम भक्तीचे ते मुर्तीमंत उदाहरण होय.पांडुरंगाशिवाय नामदेवरायांचे एक पानही हलत नसेन.त्यांच्यासाठी पांडुरंग आई होती,सखा होता, जिवीचा विसावा होता.त्याचे दर्शन होता त्यांचे देहभान हरखून जाई आणि आनंदाश्रूंनी डोळे भरत.नामदेवरायांनी देवाबरोबर गप्पा माराव्या,खेळावे असा नित्य क्रम असें. कधी नामदेवांनी रुसवा धरावा,पण दुसऱ्या क्षणी त्यांना चैनही न पडावे! असें या भगवंत नि त्याच्या प्रिय भक्ताचे लडिवाळ नाते होते. तू माझी माउली मी वो तुझा तान्हा । पाजी प्रेम पान्हा पांडुरंगे॥  असें नामदेवरायच म्हणतात. आपल्यापैकीं अनेकांनी नामदेवरायांच्या लहानपणीची एक आख्यायिका ऐकली असेल.बाल नामदेवांच्या आई गोणाई विठ्ठलाच्या नैवेद्यासाठी नामदेवांना दूधाची वाटी घेऊन देवालयांत पाठवतात.ती नैवेद्याची वाटी घेऊन नामदेवराय देवासमोर ठेवतात आणि तिथेच बसून रहातात.खूप वेळ झाला तरी देव काहीं नैवेद्य घेत नाहीं...

केसरी प्रबोध

Image
  स्वदेश,स्वराज्य,स्वदेशी,स्वभाषा व स्वधर्म या पांच तत्त्वांचा गेल्या शतकांत उच्चरवाने क्रांतिघोष कुठल्या एका पत्राने त्वेषाने केला तो म्हणजे केसरी ने.लोकमान्य बा.गं.टिळक आणि सुधारक गो.ग.आगरकर यांनी सुरु केलेले केसरी आणि मराठा वृत्तपत्रे ही भारताच्या राजकारणांतली मोठी विलक्षण कामगिरी होती.त्याहून केसरीची सगळी सूत्रे टिळकांकडे आल्यानंतर केसरीच्या गर्जनेचा प्रतिध्वनी भारतातच नव्हे तर इंग्लंडपर्यंत निनादत होता. लोकमान्यांचा केसरी लोकजागृती बरोबर दुसऱ्या बाजूला स्वतःचा इतिहास घडवत होता.या विषयीं बोलताना पं. सातवळेकर म्हणतात, " केसरीचे धोरण राजकीय कार्यक्षेत्रांत इतर वृत्तपत्रांपेक्षा कांकणभर पुढें राहिलेलें आहे." हे अगदी शंभर टक्के सत्य होय.यातून केसरीची महत्ता लक्षांत येते. ४ जानेवारी १८८१ साली केसरीचा जन्माला आला. १९३१ मध्यें त्यांस पन्नास वर्षे होऊन सुवर्ण महोत्सव साजरा करण्यांत आला.या निमित्ताने केसरीच्या चाहत्यांनी "केसरी ज्युबिली अंक" प्रसिद्ध करण्याचा घाट घातला.त्याप्रमाणे भा.ल.भोपटकरांच्या अध्यक्षतेखाली नामवंत व्यक्तींसमवेत केसरी महोत्सव मंडळ समिती स्थापिली.न...

अलौकिक टिळक महाराज

Image
भारताच्या इतिहासात एकोणवीसावे शतक हे मला सूर्यतेजाप्रमाणें झळाळणारेच भासते.त्याचे कारणही तसेच मोठे आहे. राजकारण असो वा अध्यात्म साहित्य,विज्ञान असो कीं सामाजिक चळवळ.प्रत्येक क्षेत्रांत अशी काहीं थोर माणसे झाली कीं त्याची केवळ यादी केल्यास त्यास ग्रंथाचे स्वरूप प्राप्त होईल. इंग्रजांविरुद्ध स्वातंत्र्ययुद्ध सुरु झालेले.१८५७च्या प्रचंड रणसंग्रामाच्या एक वर्ष मागे भारतीय स्वातंत्र्ययुद्धाचे राजकीय नेत्तृत्व पुढे ज्यांच्या अमोघ सामर्थ्याने आपल्या हाती घेऊन योग्य दिशेला वळवली त्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म झालेला.लोकमान्यांनी राजकारणांत प्रवेश केल्यापासून ते त्यांच्या मृत्युपर्यंत भारताच्या राजकारणाचा तो काळ टिळक युग  असा ओळखला जातो.इतके त्यांचे कर्तृत्व एकमेवाद्वितीय आहे. टिळक महापुरुष होतेच.पण त्यांचे माहात्म्य केवळ राजकीय किंवा सामाजिक इतकेच नसून तर अध्यात्मिक दृष्ट्याही होती.याची साक्ष स्वतः श्रीमद्वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामींनी दिली आहे.स्वामी महाराजांना कोणीतरी टिळकांविषयी विचारले तेव्हा स्वामी महाराज म्हणाले लोकमान्य पूर्वजन्मी योगी होते म्हणूनच त्यांच्या ठिका...