केसरी प्रबोध
स्वदेश,स्वराज्य,स्वदेशी,स्वभाषा व स्वधर्म या पांच तत्त्वांचा गेल्या शतकांत उच्चरवाने क्रांतिघोष कुठल्या एका पत्राने त्वेषाने केला तो म्हणजे केसरीने.लोकमान्य बा.गं.टिळक आणि सुधारक गो.ग.आगरकर यांनी सुरु केलेले केसरी आणि मराठा वृत्तपत्रे ही भारताच्या राजकारणांतली मोठी विलक्षण कामगिरी होती.त्याहून केसरीची सगळी सूत्रे टिळकांकडे आल्यानंतर केसरीच्या गर्जनेचा प्रतिध्वनी भारतातच नव्हे तर इंग्लंडपर्यंत निनादत होता.
लोकमान्यांचा केसरी लोकजागृती बरोबर दुसऱ्या बाजूला स्वतःचा इतिहास घडवत होता.या विषयीं बोलताना पं. सातवळेकर म्हणतात,
" केसरीचे धोरण राजकीय कार्यक्षेत्रांत इतर वृत्तपत्रांपेक्षा कांकणभर पुढें राहिलेलें आहे." हे अगदी शंभर टक्के सत्य होय.यातून केसरीची महत्ता लक्षांत येते.
यात एक सुंदर गोष्ट मंडळाने केलीं ती, सगळ्या लेखकांचे फोटो आणि त्यांचा विषय अशी अभिनव अनुक्रमणिका छापली.त्याचा आता उपयोग असा कीं,ते लेखक नेमके कोण होते हे समजते.
सगळे लेख केसरीने त्या त्या क्षेत्रांत दिलेल्या योगदानाबद्दल नि केलेल्या प्रबोधनास्तव कृतज्ञतापर आहेत.राजकारण हा तर मुख्य विषय आहेच तथापि स्वराज्य,काँग्रेस,केसरीवरीव खटले, धर्मकारण,शिवजयंती उत्सव,लष्कर,शेती,केसरीचे मथळे,लेखमाला,मराठी भाषा,साहित्य,स्त्री शिक्षण,संप इत्यादी चळवळ,गणेशोत्सव, अशी सर्वांगीण विविध विषयांची मांडणी ग्रंथात झाली आहे.
श्रीशंकराचार्य डाॅ.कुर्तकोटी यांचा केसरीने केलेल्या राष्ट्रसेवेचा गौरव आणि प्रेरणेचा उल्लेख करून आशीर्वादपर लेख प्रथम दर्शनी छापला आहे.
४ जानेवारी १८८१ साली केसरीचा जन्माला आला. १९३१ मध्यें त्यांस पन्नास वर्षे होऊन सुवर्ण महोत्सव साजरा करण्यांत आला.या निमित्ताने केसरीच्या चाहत्यांनी "केसरी ज्युबिली अंक" प्रसिद्ध करण्याचा घाट घातला.त्याप्रमाणे भा.ल.भोपटकरांच्या अध्यक्षतेखाली नामवंत व्यक्तींसमवेत केसरी महोत्सव मंडळ समिती स्थापिली.निरनिराळ्या विषयांवर लिहिण्यासाठी केसरीच्या अनेक स्नेहीमंडळींना आवाहन करून लेख मागविले.त्यासाठी संदर्भ साहित्यही पुरविण्यात आले.गेल्या पन्नास वर्षात केसरीने केलेल्या कामाचा लोकांवर पडलेला प्रभाव,समाजातला बदल याची यथार्थ माहिती पुढच्या नव्या पिढीला व्हावी अशी लेखांची आखणी केली गेली.आणि केसरी-प्रबोध हा प्रचंड ग्रंथ साकार झाला.
वेगवेगळ्या क्षेत्रांत नावाजलेल्या ब्यांणव लोकांचा अंतर्भाव करत ग्रंथाची पृष्ठसंख्या आठशे सहासष्ट इतकी भरली आहे.त्यात श्री.म.माटे,सातवळेकर,स.वि.बापट, द.वा.पोतदार, डाॅ.वेलकर, कुर्तकोटी श्रीशंकराचार्य, भिडेशास्त्री, गिरीजाबाई केळकर,पारसनीस, पां.वा गाडगीळ, मामासाहेब दांडेकर,चित्रावशास्त्री, वैद्य.नानल, शंकरराव जोशी अशा अनेक मातब्बर व्यक्तींचे लेख समाविष्ट आहेत.
वेगवेगळ्या क्षेत्रांत नावाजलेल्या ब्यांणव लोकांचा अंतर्भाव करत ग्रंथाची पृष्ठसंख्या आठशे सहासष्ट इतकी भरली आहे.त्यात श्री.म.माटे,सातवळेकर,स.वि.बापट, द.वा.पोतदार, डाॅ.वेलकर, कुर्तकोटी श्रीशंकराचार्य, भिडेशास्त्री, गिरीजाबाई केळकर,पारसनीस, पां.वा गाडगीळ, मामासाहेब दांडेकर,चित्रावशास्त्री, वैद्य.नानल, शंकरराव जोशी अशा अनेक मातब्बर व्यक्तींचे लेख समाविष्ट आहेत.
यात एक सुंदर गोष्ट मंडळाने केलीं ती, सगळ्या लेखकांचे फोटो आणि त्यांचा विषय अशी अभिनव अनुक्रमणिका छापली.त्याचा आता उपयोग असा कीं,ते लेखक नेमके कोण होते हे समजते.
सगळे लेख केसरीने त्या त्या क्षेत्रांत दिलेल्या योगदानाबद्दल नि केलेल्या प्रबोधनास्तव कृतज्ञतापर आहेत.राजकारण हा तर मुख्य विषय आहेच तथापि स्वराज्य,काँग्रेस,केसरीवरीव खटले, धर्मकारण,शिवजयंती उत्सव,लष्कर,शेती,केसरीचे मथळे,लेखमाला,मराठी भाषा,साहित्य,स्त्री शिक्षण,संप इत्यादी चळवळ,गणेशोत्सव, अशी सर्वांगीण विविध विषयांची मांडणी ग्रंथात झाली आहे.
श्रीशंकराचार्य डाॅ.कुर्तकोटी यांचा केसरीने केलेल्या राष्ट्रसेवेचा गौरव आणि प्रेरणेचा उल्लेख करून आशीर्वादपर लेख प्रथम दर्शनी छापला आहे.

लोकमान्य आणि केसरीवरील लोकांच्या अलोट प्रेमाचे हे ग्रंथरूपी यथोचित स्मारक म्हटले तर वावगे ठरू नये.त्याच प्रेमळ भावनेने हा ग्रंथ त्यावेळेचे केसरीचे संपादक साहित्यसम्राट कै.श्री.नरसिंह चिंतामण केळकर आणि केसरो-मराठा संस्थेचे व्यवस्थापक तसेंच लोकमान्यांचे भाचे कै. श्री.धोंडो वासुदेव विद्वांस यांना हा ग्रंथ अर्पण करून लोकांना सादर केला गेला.
केसरीने केलेल्या समाजप्रबोधनाचे वाचक वर्गाने केलेला हा उत्कृष्ट सत्कार होता.
✍ अनिकेत घिवलीकर, मुंबई.

Comments
केसरी - प्रबोध
वाचायला आवडेल..