Posts

Showing posts from October, 2025

श्रीनामदेवरायांचे विष्णुसहस्रनाम चिंतन, भाग: १

Image
  नामा जपे सदा काळी । रामकृष्ण नामावळी ।  विठ्ठल विठ्ठल हृदयकमळीं । जपतसे सर्वदा ।।  श्रीम‌द्भागवतामध्यें ब्रह्मदेव देवतांना सनकादिमुनींची कथा सांगताना म्हणाले, 'हे माझे चार मानसपुत्र, सनक, सनंद, सनातन आणि सनत्कुमार आकाशमार्गाने सर्व लोकांत भ्रमण करीत असताना एकदा ते शुध्द स्वरूपी भगवान् सुन्दस्वरूपी श्रीविष्णुच्या दर्शनासाठी दिव्य अशा वैकुंठलोकांत गेलें. त्या वैकुंठलोकाचा महिमा असा आहे की, तिथे राहाणाऱ्यांचे स्वरूप विष्णुसारखीच चतुर्भुज, शंख-चक्र-गदा- पद्मधारी, सावळी असतात." पण प्रामुख्याने भागवतकार भगवान् महर्षी श्रीव्यास लिहितात "येऽनिमित्तनिमित्तेन धर्मेणाराधयन् हरिम् ।।" (३:१५:१४) की "जे निष्काम धर्माचरणाने श्रीहरिची आराधना करतात, त्यांनाच हा दिव्य लोक प्राप्त होतो". या वैकुंठात शाश्वत परमसुख प्राप्त करण्याकरीता देवही मनुष्य जन्म मिळावा म्हणून भगवान् श्रीहरिची आराधना, त्याचे गुणसंकीर्तन करण्याचे भाग्य मिळावे यासाठी परमेश्वराची आर्थना करतात. तेथे केवळ भगवंताच्या कीर्तीचे गान होत असून त्या भक्तीमध्यें देहभान विसरून, शरीर पुलकित होत्साता नेत्रांतून प्रेम...