धन्य ते संसारी। दयावंत जे अंतरीं॥
"शांतिजलधि संत श्रीएकनाथ महाराज समाधी दिवस" "नाथषष्ठी" श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी उपरांत काहीं काळात उत्तरेकडून मुसलमानी आक्रमकांचे तांडे महाराष्ट्रासह दक्षिण भारतात आदळून बहमानी, निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही वगैरे इस्लामी राज्ये धुडघूस घालू लागली.तलवारीच्या जोरावर हिंदूंवर चोहोबाजुंनी हल्ले चढवून क्रूरतेच्या टाचेखाली तूडवू लागली.देवालयांच्या धडाधड मशिदी होऊ लागल्या, शेती-वाड्यांची जाळपोळ, बायकां-मुलांवर अत्याचार, करत्या पुरुषांच्या कत्तली, बाटवाबाटवी, एकना अनेक अनन्वित छळ हा महाराष्ट्र नि देश सोसत होता. त्या कालखंडात गोदावरीकाठी प्रतिष्ठान नामक संपन्न नगरीत शके १४५० इ.स.१५३२ च्या सुमारास श्रीभानुदासांचा नातू श्रीसुर्यनारायण नि त्यांच्या पत्नीस रुक्मिणीच्या पोटी श्रीएकनाथ जन्मले. प्रतिष्ठान नगरी म्हणजेच पैठण.शककर्ता शालिवाहन अर्थात सातवाहनाची ही राजधानी. या नगरीचे वैभव ओळखून तीस दक्षिण काशी म्हणून गौरविले जाई.सत्त्वशील ब्राह्मण संत घराण्यात नि संपन्न नगरीत जन्मलेले श्रीएकनाथ महाराजांची मूळची वृत्ती भगवद्भक्तमय असल्याने तीचे पोषणही त्याच प्रकारें ...