Posts

Showing posts from December, 2025

श्रीएकनाथ महाराजांचे विष्णुसहस्रनाम चिंतन, भाग :१

Image
  .  अगाध श्रीहरिचा महिमा । त्याचा पार नेणे ब्रह्मा || - श्रीएकनाथ महाराज.  भगवान् श्रीमहाविष्णूंच्या श्रीकृष्णावतार धारणामधील अनेक प्रयोजनापैकी एक म्हणजे जड-जीवांचा उद्धार हा आहे. जो मूळांत अजन्मा आहे, त्यांची जयंती ही निश्चित कुठल्याना कुठल्या बृहद्लीलेकरीता घडलेली किंबहुना घडवून आणलेली क्रीडा असते. ती कारणविरहित असणे शक्य नाहीं. श्रीभागवतकार लिहितात : "कलौ जनिष्यमाणानां दुःखशोकतमोनुदम् । अनुग्रहाय भक्तानां सुपुण्यं व्यतनोद यशः ॥" ( ९:२४:६१) कलियुगामध्यें जन्माला येणाऱ्या भक्तांचे दुःख, उद्वेग, अज्ञान, अगदी पापेही नष्ट करून त्यांच्यावर अखंड कृपा करावी, अनुग्रह करावा असें भगवंताने अत्यंत पुण्यकारक यशस्वी चरित्र करून दाखविले, असा या श्लोकाचा भावार्थ आहे. श्रीभगवद्गीतेतही भगवंत वचन देतात "अपिचेत्सुदुराचारो भजते मामनन्यभाक्। साधुरेव स मन्तव्यः सम्यग्व्यवसितो हिसः ॥" ( ९:३०) 'अत्यंत दुर्वर्तनी मनुष्य देखील जर अनन्य भक्तीने माझी उपासना करील, तर त्यासही सज्जनच समजावे. कारण त्याच्या बुद्धीचा निश्चय ईश्वरभक्ती शिवाय अन्य काहीं नाहीं असा झालेला असतो.' आणि एकदा का ...