महाभारतांतर्गत श्रीविष्णुसहस्रनाम

 


वैदिक सनातनधर्माचें तत्वज्ञान व नीतिमूल्यांचे सार असलेला ग्रंथ श्रीमद्भगवद्गीता आणि भगवंताच्या असीम गुणैश्वर्याचा समुचय श्रीविष्णुसहस्रनाम या स्तोत्रात प्रकट झालेला आहे.श्रीशंकराचार्यां पासून सगळ्यांनी या दोन्हीचे माहात्म्य शिरोधार्य मानले तथा वृद्धींगत होत गेले. आचार्यांनी गेयं गीता नामासहस्रं अशी त्याची महती आपल्या चर्पटपञ्जरिकेत आवर्जून नमूद केलीं आहे. गेयं म्हणजे गाण्याजोग अर्थात समस्त मानवजातीला सुगमतेने पारमार्थिक उन्नती भगवद्गीता आणि सहस्रनामाच्या आश्रयाने करता येईल.

महाभारताच्या अनुशासन पर्वात पितामह भीष्मांनी धर्मराज युधिष्ठिरास हे दिव्य सहस्रनाम सांगितला आणि ते सांगत असताना प्रत्यक्ष भगवान् श्रीकृष्णाचा त्यास अनुमोदन होते.हा या सहस्रनामाला एका प्रकारे आशीर्वादच म्हणावा लागेल. त्याची थोडक्यात कथा अशी आहे -
भरती युद्धानंतर श्रीकृष्ण भीष्म पितामहांकडे येऊन त्यांनी पांडवांना उपदेश करण्याविषयीं सांगतो. परंतु भीष्म वासुदेवास म्हणतात की,"स्वतः भगवंत आपण असताना मी काय उपदेश द्यावा?" तथापि भगवंतांनी भीष्मांनाच उपदेश करण्याची विनंती केलीं. अष्टसात्विक तेज गंगापुत्रांच्या ठायीं एकवटून त्यांनी आचारधर्म, राजधर्म, नीतिशास्त्रासंबंधी मार्गदर्शन केलें. शेवटी धर्मराज पुढे विचारतो कीं कुठल्या एका धर्माचे आचरण केल्यास मनुष्यजन्माचे सार्थक नि दुःख मुक्त होईल? या प्रश्नात सहस्रनामस्तोत्राचे बीजारोपण झालें. मग भीष्माचार्य धर्मराज युधिष्ठिरास परमात्म्याच्या गुणांचे वर्णन सांगतात. स्तुवन्नामसहस्रेण पुरुषः सततोत्थितः॥ या सहस्रनामाद्वारें भगवंताचे निरंतर गुणसंकीर्तन केल्याने लोक दुःखमुक्त होतील असें प्रास्ताविक करून, विष्णोर्नामसहस्रं मे शृणु पापभयापहम् - हे सहस्रनाम पाप आणि भय यांपासून सोडविणारें आहे ते माझ्याकडून ग्रहण कर असें सांगून मग मुख्य स्तोत्र किंवा नामावली सुरु होते.
शेवटी फलश्रुतींच्या श्लोकात मनुष्याला त्यांचे इप्सित प्राप्त होऊन न ते यान्ति पराभवम् अशी जयश्रीची ग्वाही दिली आहे.

हे सहस्रनाम केवळ एक हजार नांवांची जंत्री नसून वा काल्पनिक नांवांची यादीही नसून स्तोत्राच्या आरंभी महाभारतात जे प्रास्ताविक श्लोक आले आहेत त्यावरून स्पष्ट होते कीं, यानि नामानि गौणानि  विख्यातानि महात्मनः। ऋषिभिः परिगितानि तानि वक्ष्यामि भूतये॥  म्हणजे पूर्वी ऋषींनी निरनिराळ्या प्रसंगी भगवंताचे ज्या नांवांनी श्रुतीस्मृतीत स्तवन केलें ती नामें सहस्रनामस्तोत्रात एकत्र केले आहेत.

प्रथम भगवान् श्रीवेदव्यासांच्या या महोत्तम कृतीला साष्टांग दंडवत होय.
सहस्रनामावर पहिलें भाष्य आद्य श्रीशंकराचार्यांचे आहे. त्यात नामांचे भाष्य निर्गुण तत्त्वानुसार करुन त्यात अद्वैत मताचा सिद्धांत दिसून येतो.
श्रीरामानुजीय सांप्रदायी श्रीपराशर भट्ट यांनी त्यांच्या विशिष्टाद्वैतानुसार भाष्य लिहिले, माध्वमतांच्या आचार्यांनी त्यांच्या सांप्रदायाप्रमाणें.
आयुर्वेदाच्या चरकसंहितेत व्याधी निवारणार्थ स्तुवन्नामसहस्रेण ज्वरान् सर्वान् व्यपोहति तसेंच पराशरमुनींच्या "बृहद् होराशास्त्र" यामध्यें  ग्रहपीडा नष्ट होण्यासाठी विष्णुसाहस्रं जपेत् असें लिहून ठेवले आहे.

केवळ श्रीवल्लभाचार्यांच्या पुष्टिमार्गी सांप्रदायात निराळे पुरुषोत्तम सहस्रनाम म्हटले जाते.
लोकमान्य टिळक सहस्रनामाचा उल्लेख भक्तिकोश असा करतात. आणि ते रास्तच आहे. परमेश्वराचे गुण भक्तांच्या मनात बिंबविण्यासाठी नि भक्ती दृढ करणारा हा एक भक्तिकोशच म्हणावा लागेल.

सहस्रनामात गुणांवर अधिक भर दिलेला असून तें स्थूल अवतार कथांपासून वेगळें ,सूक्ष्म रूपगुणवर्णन करणारे आहे.
भगवद्गीतेमध्यें गुणासंबंधीच्याही पुढचा विचार आहे- गुणेभ्यश्च परं वेत्ति मद्भावं सोऽधिगच्छति। (गीता १४:१९) गुणांच्या पलीकडचें {तत्व} ओळखतो, तेव्हा तो माझ्या स्वरूपाला पोंचतों
सहस्रनामांत एक गम्मत पहा कशी आहे, शब्दातिगः शब्दसह{श्लोक ९७} म्हणजे ईश्वर शब्दांच्या पलीकडे आहे तरी शब्द सहन करतो!
माउली ज्ञानेश्वर म्हणतात- स्तुती ते तुझी निंदा । स्तुतिजोग नव्हेसी  गोविंदा।। आम्ही तुझी स्तुती करतो पण वास्तविक ती तुझी निंदाच होत्ये. 

श्रीसमर्थांच्या दासबोधात चोवीसनामी, सहस्रनामी, अनंतनामी तो अनामी। असें परतत्तवाशी नाते जोडले.

श्रीतुकोबांनी सहस्रनामाची उपासना आणि त्यावर भरपूर अभंग रचना केलीं आहेत.
नाव धड करा सहस्र नामांची। जे भवसिंधूची थडी पावे॥
सहस्रनामामुळें संसारची नौका पैलतीरी व्यवस्थित लागेल असें ते म्हणतात.

ऋग्वेदान्तर्गत असलेल्या पुरुषसूक्ताची  नि सहस्रनामाची एकवाक्यता मला नेहमीच दिसतें. त्यात विश्वाची निर्मिती करणाऱ्या अनंत, विराट परमेश्वराच्या गुणसंबंधीच स्तुती केली आहे.  त्यातले सहस्राक्ष , सहस्रपात् ही नामे सहस्रनामात तशीच घेतलेंली आहेत.

आचार्यापासून संत,ते आता आतापर्यंत अनेकांनी या विष्णुसहस्रनामाची महती सांगितली,प्रसार केला.श्रीविनोबा भावे,श्रीदासगणु महाराज, स्वामी वरदानंद भारती ,कन्नडमध्यें बी.गोविंदाचार्य, श्री.शिरिषदादा कवडे,श्री.कुंदर दिवाण इत्यादी अनेक भाविक मंडळींनी त्यावर आपआपली मतं मांडली,भाष्य लिहिले.असंख्य लोकांच्या नित्य उपासनेचे साधन म्हणून आजही सहस्रनाम प्रसिद्ध आहे.

सहस्रनामाचा पाठ करीत असताना  त्यातल्या भगवंताच्या गुणांचे वर्णन लक्ष्यात घेता ,त्या त्या नामाची व्याप्ती,आख्यायिका,भावार्थ, याविषयी अधिक जाणून घ्यायची इच्छा निर्माण झाली. तेव्हा त्या संबंधी अभायास,वाचन करता करता ह्या ज्ञानाचा लाभ इतरांना व्हावा म्हणून त्यासंबंधी काहीं लेखन होत गेलें. श्रीविष्णुसहस्रनाम महती या नांवाने पुढें काहीं लेखन आपल्यासमोर मांडेन.

                   स्मरण देवाचे करावें। अखंडनाम जपत जावे

                        नामस्मरणें पावावें। समाधान॥

✍ अनिकेत घिवलीकर. ज्येष्ठ शु.४,मुंबई.


Comments

अप्रतिम...!😊👌👌
Kedar Bhide said…
अप्रतिम, नक्कीच वाचायला आवडेल. अभिनंदन आणि अनेक शुभेच्छा 👍👍
धन्यवाद🚩
धन्यवाद 🚩
आभारी आहे केदार🚩
Amit said…
विचार चांगले व्यक्त केले आहेत
धन्यवाद🚩
Unknown said…
पुन्हा पुन्हा वाचून धन्य व्हावे अश्या अद्भुत लेखमालेच्या ब्लॉगवतरणाला खूप शुभेच्छा! हरि हरि <3
Unknown said…
छान अनिकेत 😊
अनेक अनेक आभार 🙏🏻🚩
Thankyou soo much Mamma🤗😊
धन्यवाद🚩
Aashish Pawar said…
Thanks for sharing this
Geeta Patil said…

चातुर्मास निमित्ताने विष्णुसहस्रनाम रोज म्हणण्याचा संकल्प केला आहे. पण सोबत स्तोत्राविषयी माहिती करुन घेण्याची इच्छा झाली. Search मधून तुमच्या ब्लॉग ने अभ्यासाची सुरुवात चांगली झाली. धन्यवाद!
अनेक आभार🙏🏻🚩
खुप सुंदर आहे
खुपच सुंदर आहे

Popular posts from this blog

श्रीएकनाथ महाराजांचे विष्णुसहस्रनाम चिंतन, भाग :१

श्रीविष्णुसहस्रनामांतर्गत नवविधाभक्ती, भाग १

श्रीनामदेवरायांचे विष्णुसहस्रनाम चिंतन, भाग: १