Posts

श्रीएकनाथ महाराजांचे विष्णुसहस्रनाम चिंतन, भाग :१

Image
  .  अगाध श्रीहरिचा महिमा । त्याचा पार नेणे ब्रह्मा || - श्रीएकनाथ महाराज.  भगवान् श्रीमहाविष्णूंच्या श्रीकृष्णावतार धारणामधील अनेक प्रयोजनापैकी एक म्हणजे जड-जीवांचा उद्धार हा आहे. जो मूळांत अजन्मा आहे, त्यांची जयंती ही निश्चित कुठल्याना कुठल्या बृहद्लीलेकरीता घडलेली किंबहुना घडवून आणलेली क्रीडा असते. ती कारणविरहित असणे शक्य नाहीं. श्रीभागवतकार लिहितात : "कलौ जनिष्यमाणानां दुःखशोकतमोनुदम् । अनुग्रहाय भक्तानां सुपुण्यं व्यतनोद यशः ॥" ( ९:२४:६१) कलियुगामध्यें जन्माला येणाऱ्या भक्तांचे दुःख, उद्वेग, अज्ञान, अगदी पापेही नष्ट करून त्यांच्यावर अखंड कृपा करावी, अनुग्रह करावा असें भगवंताने अत्यंत पुण्यकारक यशस्वी चरित्र करून दाखविले, असा या श्लोकाचा भावार्थ आहे. श्रीभगवद्गीतेतही भगवंत वचन देतात "अपिचेत्सुदुराचारो भजते मामनन्यभाक्। साधुरेव स मन्तव्यः सम्यग्व्यवसितो हिसः ॥" ( ९:३०) 'अत्यंत दुर्वर्तनी मनुष्य देखील जर अनन्य भक्तीने माझी उपासना करील, तर त्यासही सज्जनच समजावे. कारण त्याच्या बुद्धीचा निश्चय ईश्वरभक्ती शिवाय अन्य काहीं नाहीं असा झालेला असतो.' आणि एकदा का ...

श्रीनामदेवरायांचे विष्णुसहस्रनाम चिंतन, अंतिम भाग.

Image
  अभंग : ३ सांडोनि नित्य नेम कर्म । बोलती कलिकाळाचे वर्म ॥ नामधारक नामाचे । झाले डिंगर केशवाचें ॥ टाळ मृदंग वाजती । टके पताका शोभूती ॥  कंठी तुलसींच्या माळा । वज्र पंजराचा टिळा ॥  शंख चक्र मुद्रा धरणे। अंगी मिरवती भूषणे ॥  संतरज उधळले । तेणें सर्वांग डवरलें ॥ सहस्रनामें गर्जित । तेणें पळाले यमदूत ।।  नामा म्हणे ने माझे सखे। स्वामी विठोबासारिखे ॥ भावार्थ:  संत आपल्या नित्यनेम कर्माचा त्याग करून नामस्मरणाचे वर्म सांगतात. नामसाधक मंडळी नामाच्या बळावर केशवराजाचे भक्त झाले आहेत. टाळ-मृदंगाचा गजर करीत ध्वज पताका घेतले आहेत. त्यांनी कंठी तुलसीमाला धारण केली आहे, मस्तकावर उर्ध्वपुंड्र- चंदनाचा टिळा लावला आहे, शंखचक्रांच्या मुद्रा अंगावर धारण केल्या नि त्यांचे सर्वांग संतचरणरजाने माखून गेले आहे. त्यांनी विष्णुसहस्रनामाचा उच्चरवाने घोष केल्यामुळें यमदूनही पळून गेले. नामदेव महाराज म्हणतात असें दयाळू अंतःकरणाचे माझे सखे मला विठ्ठलासारखे प्रिय आहेत. विवरण :  सदर अभंग नामदेवरायांच्या गाथेत "संतमहिमा" या प्रकरणांत अंतर्भूत केला आहे. विठ्ठलाच्या नामस्मरणांत आकंठ न्हाह...

श्रीनामदेवरायांचे विष्णुसहस्रनाम चिंतन, भाग : २

Image
  अभंग :१) केशव म्हणतां क्लेश जाताती परते । त्याहूनि सरतें आणिक नाहीं ।। वेद का पढसीं शास्त्रें कां शिणसीं । उखंड वाचेसी हरि म्हणा ॥ याहूनि पै सार नाहीं हो दुसरें । भीष्मे युधिष्ठिर  उपदेशिला।। नामा म्हणे धरा केशवीं विश्वास । तुटे गर्भवास नामें ए के ॥ भावार्थ : -  भगवान् श्रीकेशवाचे नामोच्चार करतांच मानवाच्या दु:खाचे हरण होते, अशा नामाच्या तुल्यबळा अन्य काहीं नाहीं. वेदशास्त्रांचे पठण करण्यात शक्ती का वाया दवडतो? त्या ऐवजी मुखाने हरिनामाच्या घोष करा. हाच उपदेश भीष्मांनी युधिष्ठिरास केला, की हरिनामाशिवाय दुसरे साधन नाहीं, ज्यामध्यें सगळ्या शास्त्रांचे सार सामाविलेले आहे. नामदेवराय म्हणतात, केशवाप्रती आपल्या हृदयांत विश्वास ठेवा, तोच जन्ममरणाच्या फेऱ्यातून तुमची मुक्तता करेल. विवरण :-    या अभंगाचे मर्म नामदेवरायांच्याच वचनाचा आधार घेत म्हणावयाचे तर "नाम घेतां भगवंताचे । पाश तूटती भवाचे॥" या आशयाचे आहे. नामोच्चार, नामस्मरण, नामसंकीर्तन या साधनेद्वारें मनुष्याचे कोटकल्याण आहे असें सगळ्या संत, ऋषी-मुनींनी म्हटले आहे. अगदी श्रीशंकराचार्यां- सारख्या अद्वैतमार्गी...